Rajgad Bees Attack Saam tv
मुंबई/पुणे

Rajgad Bees Attack: किल्ले राजगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, चार पर्यटक गंभीर जखमी

Rajgad Bees Attack: पुण्यातील राजगड किल्यावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune Rajgad Bees Attack:

पुण्यातील राजगड किल्यावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तब्बल २५ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. सर्व पर्यटक मुंबई आणि पुण्यातील आहेत. या हल्ल्यामध्ये चार पर्यटक गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. या पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील किल्ले राजगडावरील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या किल्ल्यावर तब्बल २५ जणांचा मधमाशांनी चावा घेतला आहे. किल्ल्यावरील सुवेळा माची परिसरात ही घटना घडली आहे.

एका पर्यटक माशा चावल्याने बेशुद्ध झाला आहे. तर या मधमाशांच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या किल्ल्यावरील जखमींना वेल्हा पोलीस आणि स्थानिक यंत्रणेकडून स्ट्रेचरवरून गडावरून खाली आणण्यात आलं आहे.

सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास राजगडाच्या अतिदुर्गम सुवेळा माचीवर हा प्रकार घडला. मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणाहून आलेले चाळीसहून अधिक पर्यटक सुवेळा माची परिसरात फिरत होते.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्याहून सोळा जणांचा ग्रुप किल्ले राजगडावर पर्यटनासाठी आला होता. किल्ल्यावर सुवेळा माची जवळ मधमाशांचं पोळ होतं.

गडावर आलेले पर्यटकांनी अंगावर सुगंधी द्रव्यामुळे मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या मधमाशा दोन महिला आणि दोन पुरुषांना अधिक चावल्या. या चार जणांची प्रकृती चिंताजनक होती. तर इतर पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर

Maharashtra Live News Update: अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून होणार सुरू

Panchang Today: आजचा दिवस नियोजन आणि सकारात्मक विचारांसाठी योग्य; ४ राशींना विशेष फायदा

Blouse Back Designs: साध्या साडीपासून पार्टी वियर साडीपर्यंत; ब्लाउजच्या या 7 फॅन्सी बॅक डिझाईन्स करा ट्राय

Eye Yoga Exercise: चष्मा कधीच लागणार नाही, घरीच करा हे 5 योगा

SCROLL FOR NEXT