pune kolad highway saam tv
मुंबई/पुणे

Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन झालं जागं, पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची वाढली गती

काही दिवसांपूर्वी याबाबत साम टीव्हीने याचे वृत्त दाखविले हाेते.

दिलीप कांबळे

Mulshi News :

मुळशी तालुक्यातील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्ग (pune kolad highway) क्रमांक 753 एफचे काम अतिशय संथ गतीने चालू होते. परिणामी अनेक प्रवाशांना त्याचा त्रास हाेत हाेता. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दाखवताच प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर या महामार्गाचे कामाने वेग घेतला आहे. (Maharashtra News)

मुळशी तालुक्यातील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफचे काम अतिशय संथगतीने चालू आहे. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी उलटून गेला तरी काम सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे.

याच रस्त्यावर असणाऱ्या पिरंगुट घाटात रस्त्याच्या कडेच्या संरक्षक भिंतींचे काम सध्या सूरू आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत साम टीव्हीने याचे वृत्त दाखविले हाेते. तसेच मुळशी तालुका शिवसेना उबाठा गटाने काम मार्गी लावण्याची मागणी केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या महामार्गावर चालणारे काम संथगतीने सुरू असून आणि घाटात संरक्षक भिंत बांधण्याची मागणी पत्राद्वारे देखील सार्वजनिक बांधकाम खात्यास केली होती. साम टीव्हीच्या वृत्ताची दखल घेत आता पुन्हा कामाची गती वाढली आहे. या कामामुळे या रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या हजारो वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. सचिन खैरे (मुळशी तालुका अध्यक्ष उबाठा) यांच्यासह प्रवाशांनी साम टीव्हीमुळे (saam impact) कामाची गती वाढल्याने आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT