Pune Crime x
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! पानटपरीवर जोरदार राडा, कोयत्याने झालेल्या हल्ल्यात तरुण ठार

Pune News : पुण्याच्या कात्रज परिसरात तुफान राडा झाला. पानटपरीवर किरकोळ रागात तरुणावर कोयत्याने वार करण्यात आला. डोक्यावर वार झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Pune : पुण्यातील कात्रज भागात खळबळजनक घटना घडली आहे. पानपट्टीवर झालेल्या शुल्लक भांडणावरुन एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना साई सिद्धी चौकाच्या पानपट्टीवर घडल्याचे म्हटले जात आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आर्यन साळवे असे आहे. आर्यन हा मूळचा नाशिकचा, आर्यन त्याच्या मामाकडे धनकवडीमधील आंबेगाव पठार येथे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी (११ जुलै) रात्री तो साई सिद्धी चौकातील पानपट्टीवर पान खाण्यासाठी गेला होता. त्याचदरम्यान आर्यनचा धैर्यशील मोरे याच्याशी वाद झाला.

वाद वाढल्याने रागाच्या भरात धैर्यशील मोरेने कोयत्याने आर्यन साळवेवर सपासप वार केले. कोयत्याचा वार आर्यनने त्याच्या हातावर झेलला. कोयत्यामुळे आर्यनची बोटे तुटली. मोरेने आर्यनच्या डोक्यावर कोयत्याने जोरात वार केला. यानंतर आर्यन साळवे गंभीररित्या जखमी झाला. आसपासच्या लोकांना आर्यनला रुग्णालयात नेले.

रुग्णालयामध्ये नेल्यानंतर उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी आर्यनला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात धैर्यशील मोरेला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षिका प्रियांका निकम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT