Kalyani Nagar Pune robbery case latest news  Saam TV
मुंबई/पुणे

'रागाने का पाहतोस?' म्हणून अडवले, अन् पुण्यात घडला भयंकर प्रकार, ८७ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर धक्कादायक सत्य उघड

Pune robbery : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये ‘रागाने का पाहतोस?’ असे म्हणत एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन १५ हजार रुपये लुटल्याची घटना घडली. येरवडा पोलिसांनी ८७ सीसीटीव्ही तपासून दोन आरोपींना अटक केली.

Akshay Badve

Kalyani Nagar Pune robbery case latest news : रस्त्याच्या बाजूला शांतपणे उभा राहून फोनवर बोलणाऱ्या एका तरुणाला "रागाने का पाहतोस?" असा जाब विचारत जीवे मारण्याची धमकी देऊन लुटल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कल्याणीनगर परिसरात १९ ऑगस्ट रोजी घडलेल्या या थरारक प्रकारानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील तब्बल ८७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आणि तांत्रिक विश्लेषण करून हडपसर भागातील दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथे पीडित व्यक्ती फोनवर बोलत उभी असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी भामट्यांनी त्याला विनाकारण अडवून वाद घातला.

"माझ्याकडे रागाने का बघतोस?" अशी विचारणा करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने हिसकावून पसार झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून येरवडा पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने हलवली. घटनास्थळ आणि परिसरातील तब्बल ८७ सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी केल्यानंतर तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे आरोपी हडपसर भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार येरवडा पोलिसांनी हडपसर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून निखील ऊर्फ दाद्या शशिकांत कांबळे (वय २६) आणि अयान नासीर शेख (वय २२) या दोघांना ताब्यात घेतले. हे दोघेही हडपसर पोलीस ठाण्याच्या दप्तरावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांनी कल्याणीनगर येथील ही जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Beach : रुपेरी वाळू अन् निळेशार पाणी! सिंधुदुर्गातील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहून वेडे व्हाल

Kanda Methi Bhaji Recipe: चहासोबत खाण्यासाठी झटपट बनवा टेस्टी कुरकुरीत कांदा-मेथी भजी; वाचा सोपी रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; होणारी बायको कोण? हिऱ्याच्या अंगठीने वेधलं लक्ष, पाहा PHOTO

Accident News : भीषण अपघात! चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक; २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

SCROLL FOR NEXT