Pune Porsche Crash Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Crash : कल्याणी नगर अपघातप्रकरणी मोठी अपडेट; पोर्शे कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता

Pune Porsche Car Accident : पोर्शे कारमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे कंपनीने केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे, पुणे

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अपघात झालेल्या पोर्शे कारमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे कंपनीने केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. कंपनीकडून अधिकृत अहवाल पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कारमध्ये लावण्यात आलेला सीसीटीव्ही सुद्धा तपासण्यात आला आहे. अपघातानंतर पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन तरुणाच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यावर काही दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन कारची तपासणी केली. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अल्पवयीन मुलाचे वडिल, आजोबा आणि आईवर देखील कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालने मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिल्याने पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

18 मे रोजी रात्रीच्या सुमासार कल्याणीनगर येथे एक भीषण अपघात झाला. यामध्ये अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसह पोर्शे कारमधून पबमधून नशेच्या अवस्थेत घरी जात होता. यावेळी कार चालवताना त्याने रस्त्याने जाणाऱ्या अन्य एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचारीवरील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. कार आपलाच अल्पवयीन मुलगा चालवत होता अशी कबुली देखील त्याच्या आई-वडिलांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT