Pune Accident  
मुंबई/पुणे

Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

Kalyani Nagar Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील आणखी एक अपघात समोर आला आहे. कंटेनरने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Pune Kalyani Nagar Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणामुळे (Kalyani Nagar Accident) महाराष्ट्र ढवळून निघाला होता. याप्रकरणी अद्याप कोर्टात सुनावणी सुरु आहे. मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाने पोर्शे गाडीने (porsche car accident pune) दुचाकीला उडवले होते. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. आता कल्याणीनगरमधील आणखी एक अपघात समोर आलाय. कल्याणीनगरमध्ये २० जानेवारी २०२४ रोजी एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका जणांचा मृत्यू झाला, तर दुसरा व्यक्ती जखमी आहे. या अपघतानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. य. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासले -

पुणे-नगर रस्त्यावरील कल्याणीनगर जंक्शन येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. हा गंभीर अपघात करणारा कंटेनर चालक अपघात करून फरार झालेला होता. या आरोपीचा येरवडा पोलिसांनी तपास करत अटक केलीय. या आरोपीचा शोध घेत असताना येरवडा पोलिसांनी (yerwada police station) सुमारे 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपास केला आहे.

20 जानेवारी 2024 रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे नगर रस्त्यावरील कल्याणी नगर जंक्शन येथे दुचाकीला कंटेनरने पाठीमागून धडक देऊन गंभीर अपघात झालेला होता. या अपघात दुचाकीवर मागे बसलेला तरुण ईशान सुनील करवडे (वय 34) याचा मृत्यू झाला तर चालक गौरव खांडरे हा गंभीर जखमी झाला होता.

आरोपीला बेड्या -

अपघात करून कंटेनर चालक फरार झाला होता. याप्रकरणी आरोपी कंटेनर चालकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला होता. अपघात करणारे आरोपीचा शोध घेत असताना येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सुमारे 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. हा अपघात हा कंटेनर क्रमांक (MH 46 -AR 4836) वरील चालक मोहम्मद आशिम हातिम अन्सारी (वय 34,रा. कुनारा, झारखंड) याने केला असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT