Pune Jewellery Store Robbery News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : कोयत्याचा धाक दाखवला, सोन्याचे दागिने गुंडाळून फरार झाले; पुण्यात सराफा दुकानावर लाखोंचा दरोडा

Pune Jewellery Store Robbery News : पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून सराफाचं दुकान लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून ४ दरोडेखोर अद्याप फरार आहेत.

Alisha Khedekar

  • पुण्यात सराफा दुकानावर दरोडा

  • सोन्याचे दागिने लुटले

  • चार दरोडेखोर कोयता दाखवत दुकानात घुसले

  • घटना CCTV मध्ये कैद; पोलीस तपास सुरु

सचिन जाधव, पुणे

पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून सराफाचं दुकान लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सोनं लुटून घटनास्थळावरुन पळ काढला आहे. सदर घटना पुणे सोलापूर रोड मांजरी हद्दीतील शेवाळवाडी येथे काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलीस या घटनेचा तपास घेत असून मांजरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोड मांजरी हद्दीतील शेवाळवाडी गावामध्ये रस्त्याच्या कडेला महावीर ज्वेलर्स आहे. या सराफा दुकानात काल सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास चार जण हातामध्ये लांब धारदार कोयते घेऊन,ज्वेलर्सच्या दुकानात घुसले. यावेळेस दुकानांमध्ये केवळ मालक एकटेच होते.

मालक एकटे असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. कोयता हातात घेऊन दरोडेखोरांनी सराफाला धमकावत दुकानामधील सोन्याचे दागिने गोळा करण्यास सुरूवात केली. हातात लोखंडी हत्यार असल्याने मालकाला आरडाओडा केल्यास जीवे मारू अशी धमकी सुद्धा दिली. घाबरलेला दुकानदार तोंड बंद करून घाबरलेल्या अवस्थेत गप्प बसून राहिला.

मालकाने जरा सुद्धा आरडाओरडा केला नाही. दरम्यान दरोडेखोरांनी दागिने पिशवीत भरले आणि घटनास्थळावरून चौघेही पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या सराफाने तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT