Pune : ४० फुटांवरून लोखंडी सळई निसटली आणि १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर पडली; मुलाचा जीव धोक्यात ! SaamTvNews
मुंबई/पुणे

Pune : ४० फुटांवरून लोखंडी सळई निसटली आणि १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर पडली; मुलाचा जीव धोक्यात !

केबल व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव धोक्यात !

अमोल कविटकर, पुणे

पुणे : केबल व्यवसायिकाच्या निष्काळजीपणामुळे बारा वर्षीय चिमुरड्याचा जीव धोक्यात आला आहे. मुंढवा येथील भारत फोर्स कंपनी शेजारील साई पार्क सोसायटीमध्ये खाजगी केबल व्यवसायिकाच्या निष्काळजीपणामुळे एका बारा वर्षीय चिमुरड्याचा जीव धोक्यात आलाय. मुंढवा येथील साई पार्क सोसायटी व आसपासच्या परिसरात खाजगी केबल नेटवर्कचे जाळे आहे. तेथील नागरिकांच्या घरांवरून केबल्स टाकलेल्या आहेत.

हे देखील पहा :

अशाच एका घराच्या चौथ्या मजल्यावरून केबलची वायर ओढत असताना, वायर ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चार फुटांची लोखंडी सळई केबल व्यावसायिकाच्या दोन कामगारांच्या निष्काळजीपणामुळे चाळीस फुटांवरून निसटून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या बारा वर्षीय चिमुरड्याच्या डोक्यात सरळ उभी घुसली. यात चिमुरडा गंभीररित्या जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. हडपसर येथील खाजगी रुग्णालयात चिमुरड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पण, गेल्या पाच दिवसांपासून चिमुरडा शुध्दीवर आलेला नाही.

केबल व्यवसायिकाच्या दोन अनोळखी कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण नसताना चिमुरड्याचा जीव धोक्यात आला असून केबल व्यवसायिकांनी काम करत असताना परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन काम करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. तसेच केबल व्यवसायास स्थानिक प्रशासनाने परवानगी देताना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे व ज्या केबल व्यवसायिक व कामगारांच्या निष्काळजीमुळे चिमुरडा गंभीररित्या जखमी झाला आहे त्या केबल व्यावसायिकावर व कामगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी चिमुरड्याच्या पालकांनी मागणी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT