बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वर्गमित्रासह पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासामुळं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप. Saam Tv
मुंबई/पुणे

HSC Exam : पुणे हादरले! परीक्षा तोंडावर, पण अभ्यास काहीच नाही; बारावीच्या मुलाची आत्महत्या

Pune student suicide news : पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात बारावीच्या परीक्षेच्या तणावातून 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोसरी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटगरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pimpri - Chinchwad, Pune HSC Student Suicide News : थोड्याच दिवसात राज्यात बारावीच्या लेखी परीक्षेला सुरूवात होत आहे. मुलांकडून परीक्षेची तयारी दिवसरात्र केली जात आहे. करिअरसाठी बारावी महत्त्वाचा (HSC exam stress Maharashtra) टप्पा मानला जातो. त्यामुळे चांगले गुण मिळवण्यासाठी मुलांमध्ये धरपड सुरू असते. कॉलेजमध्ये सद्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहेत. पुण्यात बारावीच्या परीक्षेच्या तणावातून (Student mental health India) एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पुणे आणि आजूबाजूच्यांवर शोककळा पसरली. अभ्यास अन् परीक्षेच्या तणावातून १७ वर्षाच्या मुलाने घरातच आयुष्याचा दोर कापला. (Class 12 student suicide due to exam stress in Pune)

अभ्यास आणि परीक्षेच्या तणावातून बारावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad crime news) शहरात घडली घडली आहे. पुण्यातील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील संत तुकाराम नगर परिसरामध्ये प्रणव सुनील खेरे या 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. कुटुंबातील सर्वजण घराबाहेर गेल्यानंतर प्रणव याने टोकाचे पाऊल उच उचलले. त्याने आपण राहत असलेल्या घरात गळफस घेऊन आत्महत्या केली.

प्रणव सुनील खेरे हा भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण संस्थेत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. मात्र त्याचे कॉलेजमधील प्रकल्प अपूर्ण राहिल्याने तसेच त्याने प्रात्यक्षिक परीक्षा देखील दिली नव्हती. त्यामुळे प्रणव मानसिक तणावाखाली गेला होता. त्यामुळे प्रणव याने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात भोसरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत. प्रणव याच्या अचानक एक्झिटमुळे खेरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. पोलिसांकडून याची कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी

Masoor Pulao Recipe : रविवारी जेवणाचे टेन्शन विसरा; अवघ्या १०-१५ मिनिटांत बनवा चमचमीत मसूर पुलाव

Drinking Water: पाणी प्यायल्यानंतरही सारखीच तहान लागते? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे

Maharashtra Live News Update: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होईल, रोहित पवार नेमकं काय म्हणाले ?

ZP elections : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT