Hadapsar Pune News सचिन जाधव
मुंबई/पुणे

धक्कादायक: आत्महत्या केलेल्या मैत्रीणीचा मृतदेह बघताच इमारतीवरुन उडी घेत तरुणीने संपवली जीवनयात्रा

हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा भागवत व सारिका गायकवाड या दोघी बालपणीच्या मैत्रिणी होत्या.

Jagdish Patil

सचिन जाधव -

पुणे: मैत्रीणेने राहत्या घरी साडीने गळफास घेतला तिला रूग्णवाहिकेमधून रुग्णालयात घेऊन जात असताना पाहताच, एका मुलीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील (Hadapsar) शेवाळवाडी येथे घडली आहे. दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- १९ ) व आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- १९) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे असून वरील धक्कादायक प्रकार शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

हडपसर पोलिसांकडून (Hadapsar Police) मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा भागवत व सारिका गायकवाड या दोघी बालपणीच्या मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सारिकाने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळतच पेट्रोलिंग करणारे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते.

सारिकाचा मृतदेह पोलिस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच, आकांक्षाने पाहिलं व तिने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. पाचव्या मजल्यावरन उडी घेतली व ती रुग्णवाहिकेजवळ पडली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेला आकाक्षांचा देखील मृत्यू झाला.

अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच घबराट उडाली असून, या दोघी मैत्रींणीनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समजलेलं नाही. दरम्यान, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे उद्या कर्जतला जाणार

100 कोटी रुपयांचा व्यवहार अन् 38 पथकांची 38 ठिकाणी धाडी,1424 बँक खाती फ्रिज; काय आहे सरकारचं ऑपरेशन ट्रायडेंट?

Diwali Kitchen Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईत किचनच्या 'या' 7 जागांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येणार? संतप्त प्रतिक्रिया देत सर्वच सांगितलं

Height Growth Tips : उंची वाढवण्यासाठी हे विटामिन आहे सर्वात महत्त्वाचं! पालकांनो, आजच मुलांच्या आहारात करा हा बदल

SCROLL FOR NEXT