Recovery agent allegedly assaults a customer during a credit card dues dispute in Hadapsar, Pune. saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात गुंडगिरीचं साम्राज्य, पोलीस झोपलेले, वसुलीच्या नावाखाली एजंटची गुंडगिरी

Daylight Violence in Pune: पुण्यातील गुन्हेगारी काही कमी होण्याचं नाव नाहीयं.. अशातच आता पुण्यात वसुलीच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची कशी पिळवणुक सुरु आहे? हडपसरमध्ये नेमकं काय घडलं? आणि या घटनेमुळे बँकिग व्यवस्थेचा कारभारावर कसा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय़...

Saam Tv

पुण्यात सध्या गुंडगिरीचं राज्य सुरू आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालीय कारण हडपसर मध्ये समोर आलेली ही गुंडगिरीची घटना...हडपसरमध्ये भररस्त्यात वसुली एजंट आणि ग्राहक यांच्यात तुफान हाणामारी झालीय.. हडपसरसारख्या गजबजलेल्या शहरात दिवसाढवळ्या नेमकं काय घडलंय पाहूयात...

पुण्यातील हडपसरच्या 15 नंबर चौकात वसुली एजंट आणि ग्राहकात राडा झाला. क्रेडिट कार्ड थकबाकीवरून वसुली एजंटकडून ग्राहकाला लाथाबुक्क्यानी मारहाण केली. या शाब्दिक चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. खरंतर, वसुलीसाठी धमकावणं किंवा अपमानित करणं बेकायदेशीर असूनही दबावाचा वापर यावेळी करण्यात आलायं. यासंदर्भात पोलिसांकडून घटनेची माहिती घेत तपास सुरू करण्यात आलाय.

या घटनेनंतर ग्राहकानं थेट पोलिसांत धाव घेत वसुली एजंटनी अतिरिक्त रक्कम मागिल्याची तक्रार दिली. मात्र त्याचवेळी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

क्रेडिट कार्डवरील वसुलीसाठी रात्री अपरात्री फोन करून लोकांना धमकावण्याचं काम एजंटांकडून सुरू असतं.. मात्र, यासंदर्भात तक्रार करूनही पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला जातोय..

दरम्यान वसुली करणाऱ्या बँकांसाठी आरबीआयनं एक नियमावली जारी केलीय... मात्र वसुलीसाठी नेमलेल्या एजंटकडून ही नियमावली पायदळी तुडवली जात असल्यांच तज्ज्ञांचं म्हणणं आहे...खरंतर, काही दिवसांपूर्वीच वारजे परिसरातील एका सलूनमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. इतकचं काय तर भररस्त्यात कोयता गँगनं घालत असलेला धुडगूस थांबवण्यात पुणे पोलिस सपशेल अपयशी ठरलेत...ड्रग्ज प्रकरणाचं लोण थेट कॉलेज परिसरापर्यंत पोहचलयं...अशात वसुलीच्या नावाखाली माराहाणीच्या घटना घडत असतील, तर पुणे पोलीस नेमकं काय करतायत? शहरात राजरोसपणे 'गुंडगिरी' करणाऱ्यांवर कायद्याचा धाक का उरला नाही? पुणे पोलिस खरचं झोपलेले की गुन्हेगारांकडे कानाडोळा करून झोपचं सोंग वठवतायत... हा खरा प्रश्न आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

रुग्णाला ४ वेळा उपाशी ठेवून ऑपरेशन रद्द; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा भोंगळ कारभार

Dombivali: ८ वर्षांचे प्रेम, प्रेमी युगुलांनी कोर्टात लग्न केलं, मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वांसमोर लग्न लावतो म्हणत नेलं अन्...

SCROLL FOR NEXT