Pune liquor sale ban on Anant Chaturdashi September 25 saam tv
मुंबई/पुणे

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

Pune Ganeshotsav 2026 Dry Days Liquor Sale Ban Full Details: पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १४ आणि २५ सप्टेंबरला संपूर्ण पुण्यात ड्राय डे, तर विसर्जन मार्गांसह काही भागातही मद्यविक्री बंद राहणार आहे.

Omkar Sonawane

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मद्यविक्रीबाबत राज्य उत्पादन आदेश जारी केला आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार 14 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी पुण्यात रोजी ड्राय डे असणार आहे. 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने तर 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने या दोन्ही दिवशी मद्यविक्री करणारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय गणेशोत्सवातील पाचव्या आणि सातव्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या ठराविक मार्गावरील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवातील पाचव्या आणि सातव्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या ठराविक मार्गावरील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुण्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील परिसर गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत कोरडा क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात गणेशोत्सवातील सर्व दिवस मद्यविक्री करता येणार नाही. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिक रस्त्यावर येत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्था आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT