मुंबई/पुणे

Pune Fire News: गणपतीच्या आरतीत विघ्न, मंडपाला लागली आग; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Breaking News: पुण्यातून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या मांडवात आग लागल्याची घटना घडली आहे

Vishal Gangurde

सचिन जाधव

Pune Fire News:

पुण्यातून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात आग लागल्याची घटना घडली आहे. या मंडळाच्या मंडपात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गणपतीची आरत करत होते. मात्र, आग लागल्यानंतर जे. पी. नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मंडप परिसरात पाऊस पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात आग लागली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे गणपतीची आरती करत असताना या मंडपाला ही आग लागली.

साने गुरुजी तरुण मंडळाकडून महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. या मंदिराच्या कळसाला आग लागली. मंडपाला आग लागल्यानंतर जे पी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावं लागलं.

साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग लागली, त्यावेळी परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही मिनिटांत ही आग विझली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. मंडपाला नेमकी आग कशी लागली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यात आंबीलोढा कॉलनी येथील साने गुरूजी नगर येथे एका गणेश मंडळाने तयार केलेल्या हाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली होती. या मंदिराच्या कळसाला आग लागली. त्यामुळे भाविकांची एकच धावपळ झाली.

या आगीची घटना घडताच अग्निशमन दलाकडून दोन अग्निबंब आणि एक वॉटर टँकर घटनास्थळी पोहचले. सध्या मंडपाला लागलेली आग आटोक्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. तसेच या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT