Pune Fire News
Pune Fire News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fire News : पुण्यात अग्नितांडव! सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटली

Prachee kulkarni

Pune Fire News : पुण्यातील (Pune) सिंहगड रोड येथील दांडेकर पुलाजवळ MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहित समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं दूरपर्यंत आजीचे लोळ पसरले होते.

परिसरात लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. MNGL पाईपलाईन जरी बंद करण्यात आली असली तरी आजूबाजूला 3 ठिकाणी आग पसरली असल्याने अग्निशामन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. अखेर मध्यरात्री लागलेली ही आग (Fire) आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्यानं आग आटोक्यात येत नव्हती. या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली होती. घटनेचीमाहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

नऱ्हेत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

आगीच्याच दुसऱ्या घटनेत पुण्यातील नऱ्हे परिसरात एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. भंगार मालाच्या गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आणि पीएमआरडीए यांच्या अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या होत्या. अखेर रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT