सणासुदीच्या काळात पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई
या कारवाईत एकूण १० हजार ८८८ किलो पनीर आणि खवा जप्त
कर्नाटकातून पुण्यात आणलेल्या तीन वाहनांमधून १० हजार १६८ किलो पनीर
कर्नाटकातून पुण्यात आणण्यात आलेले पनीर आणि खवा यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १० हजार ८८८ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत ३१ लाख ६ हजार ६८० रुपये आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन वाहनांतून आणलेले सुमारे १० हजार १६८ किलो पनीर आणि कसबा पेठेतील डगळे पूल परिसरातील शिवशंकर डेअरीमधील ७२० किलो खवा आढळला.
पनीर आणि खव्याची वाहतूक व साठवणूक अयोग्य तापमानात तसेच अस्वच्छ वातावरणात होत असल्याचे आढळले. हे पदार्थ मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याच्या संशयावरून जप्त करून नष्ट करण्यात आले. ग्राहकांनी तक्रारींसाठी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.