Fake college scam exposed in Pune as authorities investigate institutions operating without valid government approval. saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात बोगस कॉलेजचं रॅकेट, 7 वर्षांपासून बोगस कॉलेजकडून पालकांची लूट, 'साम' इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश

Saam Investigation: बोगस शाळांपाठोपाठ आता पुण्यात बोगस कॉलेजेसच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. 7 वर्षांपासून पुण्यातील ज्युनिअर क़ॉलेज कशा पद्धतीनं पालकांची लूट करत होतं. लुटीचा हा गोरखधंदा नेमका कुणाच्या आर्शीवार्दानं सुरु होता. पाहूयात साम इन्वेस्टिगेशनचा हा रिपोर्ट...

Suprim Maskar

'शिक्षणाचे माहेरघर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या बोगस शाळांच्या रॅकेटनंतर आता चक्क बोगस कॉलेजेची दुकानं मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शासनाची कोणतीही वैध मान्यता नसताना, बनावट कागदपत्रांच्या आधारे पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील दोन नामांकित कॉलेजेसचा साम इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झालाय. पुण्यात बोगस कॉलेज कसे सुरु होते... पाहूयात...

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील 'ओम साई बहुउद्देशीय संस्था' या संस्थेच्या माध्यमातून हा सगळा काळाबाजार सुरू होता. या संस्थेद्वारे पुण्याच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर आणि हडपसर भागात 'स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज' चालवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, या कॉलेजेसनी चक्क जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील इतर शाळा-कॉलेजेसना मिळालेल्या शासन मान्यता पत्रांचा आधार घेतला...आदेशांमध्ये छेडछाड करून, हुबेहूब बनावट आणि खोटे दस्तऐवज तयार केले... विशेष म्हणजे 2019 ते 2026 म्हणजे तब्बल 7 वर्षांपासून ही कॉलेजेस शिक्षण विभाग, विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात धूळ फेकत ज्युनिअर क़ॉलेज बेधडकपणे चालवत होते...

दरम्यान याप्रकरणी ओम साई बहुउद्देशीय संस्थेचे तत्कालीन मुख्याध्यापकांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...या बनावट मान्यतापत्रांच्या आधारे दोन्ही कनिष्ठ महाविद्यालये सुरू ठेवण्यात आल्यामुळे पोलिस प्रशासन आता अॅक्शन मोडवर आलयं...दम्यान गुन्हा दाखल होताच कॉलेजनं कोणाला माहिती मिळू नये म्हणून वर्गांना टाळं ठोकलयं... दुसरीकडे पालकांची फसवणुक करणाऱ्या या संस्थाचालकांवर कठोर कारवाईची मागणी शिक्षणतज्ज्ञांनी केलीय...

आपल्या मुलाला चांगल्या शहरात चांगले शिक्षण मिळावे म्हणून अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील पालक पोटाला चिमटा काढून लाखो रुपयांची फी या संस्थांच्या पदरात टाकतात. मात्र, शिक्षणाचा बाजार मांडणारे हे 'महाठग' पैशांच्या हव्यासापोटी हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावतात. त्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था पोखरली जाण्यापूर्वी शासनाने यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.... आधी बोगस शाळा, मग इन्टिग्रेडेड कॉलेज आणि आता थेट बोगस कॉलेजचा पर्दाफाश. यामुळे पुण्यात शिक्षणव्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. 7 वर्षांपासून पुण्यात सुरु असणाऱ्या या बोगस कॉलेजेसना कुणाचं अभय होतं? शिक्षण विभागानं याकडे डोळेझाक कुणाच्या सांगण्यावरून केली? असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT