Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Pune News : पुण्यात पहाटेच्या सुमारास भरधाव पोलो कारचा भीषण अपघात झाला आहे . या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरु असून ड्रिंक अँड ड्राइव्हचा प्रकार असल्याचा संशय आहे.

Alisha Khedekar

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ कारचा भीषण अपघात

दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने नशेत ड्रायव्हिंगचा संशय

पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे

पुण्यातून धक्कदायक घटना समोर आली आहे. शहरातील कोरेगाव पार्क परिसरात बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कदायक म्हणजे अपघात झालेल्या गाडीच्या डिक्कीमध्ये पोलिसांना दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या फोक्सवॅगन पोलो कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात आज पहाटे ५:१० च्या सुमारास झाला. ही कार एवढ्या वेगात होती की चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटून बाजूला असलेल्या एका बस स्टॉपवर आदळली.

या दुर्घटनेत गाडीच्या पुढच्या बाजूचा चक्काचूर झाला. तसेच कारमध्ये असलेल्या तीन तरुणांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघाताचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांना तपासादरम्यान अपघात झालेल्या कारमध्ये डिक्कीत दारूच्या बॉटल सापडल्या. त्यामुळे पोलिसांना असा संशय आहे की, या तरुणांनी दारू पिऊन गाडी चालवल्याने हा अपघात झाला असावा. असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नवे ऋतिक भंडारे आणि यश भंडारे अशी आहेत. या घटनेचा पोलीस सविस्तर तपास करत असून या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताचा थरार कैद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT