Ravi Paranjape
Ravi Paranjape Saam Tv
मुंबई/पुणे

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

साम टिव्ही ब्युरो

पुणे : ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे (Ravi Paranjape) यांचे आज निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी पुण्यात (Pune) अखेरचा श्वास घेतला. रवी परांजपे यांनी रंग-रेषांच्या चतुरस्र कलाकर्तृत्वाने अवघ्या विश्वाला मोहिनी घातली होती. अंत्यदर्शन त्यांच्या मॉडेल कॉलनीतील निवासस्थानी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेता येईल. काही दिवसांपासून ते पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

परांजपे जगभरात बोध चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. जाहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्त्वाची ठरणारी बोधचित्रकला, लावण्य योजना कला (डिझाईन), वास्तुबोधचित्रकला आणि स्वान्त सुखाय सृजनात्मक चित्रनिर्मिती अशा चित्रकलेच्या विविध अंगांना स्पर्श करीत गेली अनेक वर्षे चित्रकार रवी परांजपे, आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मितीमध्ये त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा, प्रज्ञेचा व अभ्यासपूर्ण चिंतनाचा प्रत्यय देत आले आहे.

परांजपे यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. फेब्रुवारी २०२२मध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. (Ravi Paranjape)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मतदार केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT