पुण्यात आज कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात आज कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम

एक दिवसीय लसीकरणाचा पुणे जिल्ह्याने (Pune District) नवा रेकॉर्ड (Vaccinatin Record) नोंदवला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

एक दिवसीय लसीकरणाचा पुणे जिल्ह्याने (Pune District) नवा रेकॉर्ड (Vaccinatin Record) नोंदवला आहे. पुणे जिल्ह्यात आज तब्बल 2 लाख डोस टोचले गेले आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 80 लाख नागरिकांचं लसीकरण झाले आहे. संपूर्ण राज्याच्या तुलनेत पुण्याने लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला आहे. पुणे जिल्ह्या परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी याबाबद माहिती दिली आहे. सीएसआर फंडातून झेडपीला दिड लाख डोस मिळाले होते.

पुण्यात कालपर्यंत एकून ४,९५,३४३ रुग्ण आढळले आहेत. काल पुणे शहरात १२८ रुग्ण आढळले होते. त्यामळे एकेकाळी ५००० च्या वर आढळणारे रुग्ण कमी झाले आहेत. पुण्यात मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. काल पुण्यात ५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात २२३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशाच पद्धतीने जर लसीकरण होत राहिले तर पुण्यातील कोरोना लवकरच हद्दपार होऊ शकतो.

महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून सावरलेला दिसत आहे. परंतू डेल्टा व्हेरिंयटचा धोका वाढत आहे. तिसऱ्या लाटेबाबत तज्ञांकडून धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सण, उत्सवावर बंधी घालण्यात आली आहे. पुणे शहराचा विचार केला तर अजूनही १०० टक्के अनलॅाक झालेला नाही. अजून बऱ्याच गोष्टी पुण्यामध्ये बंद आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT