पुण्यात बिर्याणीवरून राडा; धायरी परिसरातील धक्कादायक प्रकार Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात बिर्याणीवरून राडा; धायरी परिसरातील धक्कादायक प्रकार

साहित्याची केली तोडफोड

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - बिर्याणीवरून Briyani झालेल्या वादात एका टोळक्याने हॉटेलमधील Hotel साहित्याची तोडफोड करत हॉटेल मालक व कामगारावर लोखंडी कोयत्याने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार धायरीतील Dhyari गारवा बिर्याणी Garva Biryani हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडला असल्याची माहिती समोर आली आहे. मयूर मते आणि इसराफील अश्फाक अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

हे देखील पहा -

सिंहगड पोलीस ठाण्यात या टोळक्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयिताना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. धायरीतील गणेशनगरमध्ये मयूर यांचे गारवा बिर्याणी Garva Biryani नावाचे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोघेजण हे बिर्याणी घेण्यासाठी आले होते.

दरम्यान मते हे त्यावेळी जेवन करत होते. त्यावेळी आरोपींनी बिर्याणीची मागणी केली असता दुसरा कामगार तंदुर भट्टीवर काम करत होता. त्यामुळे त्या कामगाराने त्यांना बिर्याणीसाठी थांबण्याची विनंती केली. त्यावरून या आरोपींनी त्या कामगारास शिवीगाळ करायला सुरुवात केली. मते यांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी आरोपींना महिला ग्राहक आहेत असे म्हणत शिवीगाळ न करण्याची विनंती केली.

या गोष्टीचा राग आल्यामुळे संबंधिताने इतर साथीदारांना बोलावून हॉटेलमध्ये प्रवेश केला. टोळक्याने हत्यार काढून मयूर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, कामगार इसराफील मध्ये पडल्यामुळे त्याच्या डाव्या हातावर मर लागला. त्यानंतर टोळक्याने मयूरवर वार करून त्यांना जखमी केले. त्यांच्या हॉटेलमधील बिर्याणीचे पातेले, झाकणे तसेच इतर साहित्याची तोडफोड केली. तसेच हॉटेलबाहेर जमलेल्या लोकांना आणि आजूबाजूच्या दुकानदारांना शिवीगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Edited By - Shivani tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods For Strong Hair: लांब आणि दाट केसांसाठी आहारात काय खावे?

Maharashtra News Live Update: भिवंडी शहरातील फातिमानगर येथील भंगाराच्या गोदामाला आग

Asha Bhosle Health Update: आशा भोसलेंची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Khaja Mithai Recipe: घरीच बनवा खमंग आणि कुरकुरीत खाजा मिठाई रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृत्यू, मुंलुंड रेल्वे स्थानकावर अपघाताचा थरार

SCROLL FOR NEXT