Shirish More Maharaj 
मुंबई/पुणे

Pune : प्रसिद्ध शिव व्याख्याते शिरीष मोरे महाराज यांची आत्महत्या, देहू हादरलं

Pune News : २० दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. हभप शिरीष महाराज हे प्रसिद्ध प्रवचन आणि कीर्तनकार त्याचप्रमाणे शिवव्याख्याते देखील होते.

Namdeo Kumbhar

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

Pune News : जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज आणि प्रसिद्ध शिव व्याख्याते ह.भ.प.शिरीष मोरे महाराज (देहूकर) यांनी आयष्य संपवले. प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण अस्पष्ट आहे. देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल झाले आहे, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या पश्चात आई- वडील असा परिवार आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्येपूर्वी शिरीष महाराज यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. महाराजांचा नुकताच टीळा देखील झाला होता. एप्रिल किंवा मे महिन्यात विवाह सोहळा होता.

दु:खातून सावरण्यासाठी वेळ देण्याची मोरे कुटुंबियांची शिरीष महाराजांच्या चाहत्यांना विनंती

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आले आहे. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय. २० दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. हभप शिरीष महाराज हे प्रसिद्ध प्रवचन आणि कीर्तनकार त्याचप्रमाणे शिवव्याख्याते देखील होते. या घटनेने मोरे कुटुंबियांसह संपूर्ण देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र या दुःखातून सावरण्यासाठी मोरे कुटुंबियांना वेळ द्यावा अशी विनंती शिरीष महाराज मोरे यांच्या चाहत्यांना मोरे कुटुंबियांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT