pune daund news saam tv
मुंबई/पुणे

Pune Breaking : पुण्याच्या दौंडमध्ये कलाकेंद्रात गोळीबार कुणी केला? पोलिसांनी काय सांगितलं?

Pune Daund News : पुण्यातील दौंड तालुक्यातील एका कलाकेंद्रामध्ये गोळीबार झाला. आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करुन ही माहिती दिली. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेची पृष्टी केली आहे.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्याच्या दौंड तालुक्यातील चौफुला येथे कलाकेंद्रामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या माहितीची पृष्टी करण्यात आली आहे. कलाकेंद्रात हवेत गोळीबार झाल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी म्हटले आहे. गोळीबार कुणाकडून करण्यात आला याबद्दल तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत दौंडमध्ये एका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची माहिती दिली होती. घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. कलाकेंद्रामध्ये हवेत गोळीबार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दौंडमधील चौफुल्याच्या तीन कला केंद्रांपैकी कोणत्या कला केंद्रामध्ये गोळीबार झाला याबाबत चौकशी सुरु आहे. तपासासाठी चौफुल्याच्या अंबिका कला केंद्रात अप्पर पोलीस अधीक्षक दाखल झाले आहेत.

पुण्याच्या दौंडमधील एका कला केंद्रामध्ये सत्ताधारी आमदाराच्या भावाने राडा घातला आहे. त्या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारामध्ये एका तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली आहे. या एक्स पोस्टनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणात गोळीबार कोणी केला याचा तपास सुरु पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

दौंडमधील एका कलाकेंद्रात पुण्यातील सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाने अंदाधुंद गोळीबार करत मोठा गोंधळ घातला. या घटनेत एक तरुणी जखमी झाली आहे. गंभीर बाब म्हणजे, आरोपी कोण आहे, याचा शोध घेण्याऐवजी पोलिस यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. दोषींवर कारवाई होणार का? की सत्तेच्या जोरावर त्यांना मोकळं सोडण्यात येणार? कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा घटनांवर पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाशिवाय कठोर कारवाई केली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT