Pune Dam Water Storage Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Dam Water Storage: पुणेकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी

Pune Dam Water Storage Increases: पुण्यात गेल्या आठवड्याभरात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, पुणे, कोकण भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्याभरात पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचा पाणीसाठा वाढला असून तो ८ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.१४ टीएमसी होता.त्यामुळेच पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात ९ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्या दिवसापासून मागील तीन दिवस पाणलोट क्षेत्रात चारही धरणांमधे १५ मीमी पेक्षाही कमी पाऊस झाला.त्यामुळे पाणीसाठ्यात जास्त वाढ झाली नव्हती.

मात्र, शुकवारी सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे. दिवसभरात पानशेत २३ मिमी, वरसगाव २३ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणक्षेत्रातील पाणीपातळी वाढली आहे. खडकवासला धरणा १ टीएमसी पाणीसाठा आहे तर पानशेत धरणात ३.६४ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे. वरसगाव धरणात २.६५ टीएमसी तर टेमघर धरणात ०.७१ टीएमसी पाणीसाठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT