Pune Dam Water Level Saam tv
मुंबई/पुणे

Pune dam water Level Today: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! संततधार पावसामुळे धरणांची पाणीपातळी वाढतेय; 4 धरणात इतका पाणीसाठा

Pune dam water Level Today: पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. संततधार पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune News: पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. संततधार पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पुणे शहराला पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस धरण क्षेत्रात चांगला बरसला आहे. पावसाला जोर नसला तरी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी पाणीसाठा वाढला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला,पानशेत, वरसगाव,टेमघर ही धरणे येतात. आज सकाळपर्यत या धरणात असणारा पाणीसाठा कमालीचा वाढला आहे. आज सकाळपर्यंत खडकवासला १.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

तर पानशेत ५.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. वरगावत धरणात ५.९६ टीएमसी तर टेमघर धरणात १.१३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. या चार धरणात आजच्या स्थितीला १३.३९ टीएमसी पाणी आहे.

धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागल्याने पुणेकरांना दिलासा मिळत आहे. धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू राहिल्यास लवकरच धरण ओसंडू लागतील.

नाशिक जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा कायम

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, नाशिक जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जुलै संपत आला, तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातही अवघे ३३ टक्के पाणीसाठा आहे. तर आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह आहे.

जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांमधील पाणीसाठा

गंगापूर धरण समूह - ३३ टक्के

पालखेड धरण समूह - २२ टक्के

दारणा धरण समूह - ५७ टक्के

गिरणा खोरे धरण समूह - २५ टक्के

जिल्ह्यातील एकूण २४ धरणांमधील पाणीसाठा - ३५ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan-Pakistan Conflict: भारताशेजारी युद्ध सुरू, २७४ तालिबानी तर ५५ पाकिस्तानी सैन्यांचा मृत्यू

Spinach Juice For Hair: लांब आणि दाट केसांसाठी प्या हा हिरवा ज्यूस, १० दिवसातच केस वाढतील भरभर

Maharashtra Live News Update : किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ

Accident News : मध्यरात्री महामार्गावर भयंकर अपघात, सहा वाहने एकमेकांना धडकली अन्...

Mumbai News : अंधेरीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिलांसोबत रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT