Pune Dahi Handi Obscene Dance Row; 8 Dancers Including Nisha Mumbaikar And Shubhangi Thorat Booked saam tv
मुंबई/पुणे

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Pune Dahi Handi Obscene Dance Row : पुण्यात दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील गाण्यांवर नृत्य करणाऱ्या डान्सर आणि आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या अश्लील प्रकारांवरुन सर्वच स्तरावरुन टीका होतेय. किती डान्सरवर आत्तापर्यंत गुन्हा दाखल झालाय ? पुणे पोलिसांची काय भूमिका आहे? पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • पुण्यातील दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील नृत्याच्या आरोपावरून पोलिसांची कारवाई सुरू आहे.

  • निशा मुंबईकर, शुभांगी थोरात यांच्यासह एकूण आठ डान्सर्सवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

  • डान्सर्ससोबतच संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांवरही पोलिसांनी कारवाई केली.

पाहिलंत हा आहे पुण्यातल्या दहीहंडीतला अश्लील धांगडधिंगा. दोन दिवसांपूर्वी डान्सर राधा पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आता इतर डान्सर आणि आयोजकांकडे आपला मोर्चा वळवलाय. दहीहंडी उत्सवात अश्लील डान्स करणाऱ्या इतर सात डान्सर्ससह आयोजकांवरही पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे आतापर्यंत आठ डान्सर्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.

या नाच गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. आत्तापर्यंत कोणा विरुद्ध गुन्हा दाखल केलाय ते पाहूया.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा

राधा पाटील

निशा मुंबईकर

शुभांगी थोरात

यांच्यासह आठ नृत्यांगनांविरोधात गुन्हा

आयोजकही गोत्यात

- अष्टविनायक मित्र मंडळ

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

- रिस्की बॉईज ग्रुप

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

असे कार्यक्रम सादर करण्यापूर्वी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमांनुसार प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नियमांचं पालन न केल्याचंही गुन्ह्यात पोलिसांनी नमूद केलंय. दुसरीकडे ठाण्यातील भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी डान्सर गौतमी पाटील आणि कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात पोलिसात तक्रार दिलीय. कारण दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना गौतमी पाटीलचं प्रेक्षकांसमोर केलेलं विधान वादात सापडलंय. तर डान्सर ऐश्वर्या जाधवनं योग्यता प्रमाणपत्र असतानाही कार्यक्रमासाठी दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्याचा आरोप केलाय. अनेक ठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम आमदारांनी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी आयोजीत केले होते.

दहीहंडीतल्या कार्यक्रमात सर्वांनी डीजेचा ठणठणाट आणि अश्लिलतेचा कळस पाहिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची लक्तरं वेशीला टांगणारे हे अश्लील डान्स कधी थांबणार? पोलीस तर गुन्हे दाखल करतील मात्र आयोजक कधी भानावर येणार? आणि अशा अश्लिल नृत्यांना चाप बसणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आयोगाची निष्पक्षता संपली, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा- खरगे

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

Blood Group and Diabetes: A, B, AB की O? कोणत्या ब्लड ग्रुपला डायबिटीजचा सर्वाधिक धोका?

Thane News: ठाकरेसेनेच्या नेत्याच्या हत्येमागे माजी महापौर शिंदेंचा हात?, ठाण्यात राजकारण तापले

Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT