Pune Crime 
मुंबई/पुणे

Pune Crime: धक्कादायक! पुणे जिल्ह्यात गुंडांचा हौदास; व्यावसायिक तरुणाचा खून

Pune Crime: गेल्या काही दिवसांपासून दौड शहरात गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केली जात आहेत.

Bharat Jadhav

नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे एका तरूण व्यावसायिकाचा खून झाल्याची घटना घडली. पुणे जिल्ह्यातील दौंड शहर परिसरात १४ दिवसांत दोन खून, एक दरोडा तीन जबरी चोरीच्या घटना वाढल्या जिल्ह्यात कायदा सुव्यव्स्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शहरात जबरी चौरी आणि खुनाच्या आधीही घटना घडल्या आहेत, त्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केली जात आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, जबरी चोरीच्या उद्देशातून तरुण व्यावसायिकाची हत्या झालीय. अमोल सुभाष साळुंखे ( वय ३३ , रा. लिंगाळी , ता. दौंड) असं खून झालेल्या व्यवसायिकाचं नाव आहे. ⁠अमोल साळुंखे यांचा स्लायडिंग काचेच्या खिडक्या व दारांचा व्यवसाय होता. मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान हा खून झाला आहे.⁠अमोल साळुंखे बोरावकेनगर येथील दुकान बंद करून घरी जात असताना बोरावकेनगर ते लिंगाळी रस्त्यालगत राखीव वन क्षेत्रात निर्जन ठिकाणी गाठत काही अज्ञातांनी त्याचा खून केला.

मारेकऱ्यांनी डोक्याच्या मागील भागावर वार केला यात अमोल यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. दरम्यान दौंड शहरात ६ ऑक्टोबर रोजी सुनील लक्ष्मण रणदिवे यांचा खून झाला होता. ⁠तर, सोनवडी येथे दरोडा आणि दौंड शहरात तीन जबरी चोरींची नोंद झालीय.

लॉजमध्ये भयंकर कांड! सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या

पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यामध्ये मृत तरुणाची प्रेयसी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचादारम्यान तिचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितेश नरेश मिनेकर असं आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT