Pune Crime x
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! पाठलाग केला, जबरदस्तीने जंगलात नेलं अन्...; महिलेसोबत नको ते घडलं

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या एका महिलेवर जबरदस्ती करण्यात आली. आरोपीने महिलेला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

Yash Shirke

Pune : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पुण्याच्या मावळ तालुक्यातील ठाकुरसाई गावात एका ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केलाय या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला ठाकुरसाई गावातून जात होती. आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपीने पीडितेला जवळच्या जंगलात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी स्थानिक पोलीस स्थानकामध्ये महिलेने तक्रार दाखल केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिलीमकर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्त्वाखालील पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. आरोपींबद्दल सुगावा मिळवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि आसपासच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले.

गुन्हा नोंदवल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली. भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३५१ (२) अंतर्गत पुणे ग्रामीणमधील लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याचा एफआयआर दाखल करण्यात आल्याचे संदीप सिंग गिल यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

Amla Thecha : चपातीसोबत खायला घरीच बनवा झणझणीत आवळा ठेचा, लगेच नोट करा रेसिपी

Face Care: बदलत्या वातावरणामुळे त्वचा खूप ड्राय आणि डल झाली? मग या पेस्टमुळे स्किन होईल नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT