Pune Crime Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime : बिबेवाडीला जाण्यासाठी स्वारगेटवरून रिक्षा पकडली अन् घडला भयंकर प्रकार; पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime News : काही दिवसापूरर्वी स्वारगेट येथून बिबेवाडीला जाण्याणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात आलं होतं. याप्रकरणी प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

Sandeep Gawade

स्वारगेट येथून बिबेवाडीला जाण्याणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात आलं होतं. तरुणांच्या गळ्यातील चांदिची साखळी. मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेऊन आल्यात होती. दरम्यान पुणे पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकांची टोळी स्वारगेट पोलिसांनी गजाआड केली असून रिक्षासह चोरीचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.

रोहित चव्हाण या रिक्षाचालकसह मयूर उर्फ संकेत प्रकाश चव्हाण,सुदर्शन शिवाजी कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात बिबवेवाडी येथील एकाने स्वारगेट पोलीस तक्रार दिली होती. त्यावरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले रिक्षा पैसे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 27 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घटना घडली होती. या आरोपींनी अजून कुठे अशा चौऱ्या केल्या आहेत त्याचा तपास पोलिसाकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबरच्या रात्री काही तरुण बिबेवाडीला निघाले होते. त्यासाठी त्यांनी स्वारगेटवरून रिक्षा पकडली. मात्र रिक्षात बसल्यानंतर काही वेळातचं त्यांना धमकावून तरुणांच्या गळ्यातील चांदिची साखळी. मोबाईल आणि १०००० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली आणि पसार झाले होते. त्यानंतर त्यातील एका तरुणाने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.

त्यानंतर पोलीस या प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीच्या मागावर होते. अखेर आज पोलिसांना ही टोळी हाताला लागली. रोहित चव्हाण या रिक्षाचालकसह मयूर उर्फ संकेत प्रकाश चव्हाण,सुदर्शन शिवाजी कांबळे यांचा या टोळीत सहभाग होता. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रिक्षासह चोरीचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. तसंच या टोळीने अजून कोणाकोणाला लुटल आहे. याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

SCROLL FOR NEXT