pune crime news saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली

Pune Suicide News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं तसेच आत्महत्येचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशाचा काहीशा घटना शहरात पुन्हा उघडकीस आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात आज दोन आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत.यामध्ये एका घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. तर दुसऱ्या घटनेत शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातच एका तरुणाने गळफास घेतला आहे.

शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचारी दादा कोकणे यांचा मुलगा ऋषिकेश कोकणे याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. ऋषिकेश याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून देखील अखेर ऋषिकेशचा दुपारी 3.30 वाजता मृत्यू झाला. आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलं नाहीये, सदर घटनेचा पोलिस तपास करत आहे.

दुसऱ्या घटनेत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या सोसायटी ऑफिसजवळील अशीच एक घटना घडली आहे. चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन सोहेल येणीघुरे (वय २८, रा.पाषाण)याने स्वतःचं जीवन संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या घरगुती वादातून झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनांमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

नागपूरमध्ये हवालदाराची आत्महत्या

आज सकाळी नागपूरमध्ये देखील अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली. वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे हेमराज ज्ञानेश्वर जीचकर यांनी काल शुक्रवारी साप्ताहिक रजा असताना पत्नी, मुलगा आणि मुलगी बाहेर गेल्यावर गळफास घेऊन जीवन संपवलं. हेमराज यांनी काही दिवसांपूर्वीच प्लॉट खरेदी केला होता. मात्र, त्यासाठी पैशांची जमवाजमाव होत नव्हती, त्यामुळे ते आर्थिक तणावात होते. हा तणावच त्यांच्या आत्महत्येचं कारण असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह संपूर्ण पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT