Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, ड्रग्सचे सेवन करणारे ते '११९' जणं पोलिसांच्या रडारवर

Pune News: पुणे पोलिसांनी अमली पदार्थांचा साठा आणि त्याची साखळी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. ड्रग्स तस्कर यांच्यावर कारवाईनंतर आता सेवन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी आपलं लक्ष वळवलं आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलीस अॅक्शन आल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांनी अमली पदार्थांचा साठा आणि त्याची साखळी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. ड्रग्स तस्कर यांच्यावर कारवाईनंतर आता सेवन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी आपलं लक्ष वळवलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी ड्रग्सचे सेवन करणाऱ्या ११९ जणांची एक यादी तयार केली आहे. पुण्यातील या ११९ जणांमध्ये अनेक तरुण आणि तरुणींचा समावेश.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विश्रांतवाडी भागातून तीन जणांना अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. मात्र फक्त तस्करी करणाऱ्यांवर कारवाई न करता आता थेट सेवन करणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

ड्रग्सचे सेवन करणाऱ्या तरुणांमध्ये याची जनजागृती व्हावी, यासोबतच खाकीचा धाक रहावा, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याशिवाय अशा व्यक्तींच्या चौकशीतून ड्रग्स विक्री करणारे आणखी कुठली नावे निष्पन्न होतात का? याचा देखील तपास पोलीस करणार आहेत. दरम्यान, पुण्यातील विश्रांतवाडी भागातून द्राक्ष तस्करी करणाऱ्या चार जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT