5 Years Old Boy Physically Assaulted By 3 Boys Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे पुन्हा हादरले! ५ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, कोंढव्यातील संतापजनक प्रकार

5 Years Old Boy Physically Assaulted By 3 Boys: पुण्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरात ही घटना घडली असून पोलिस तपास करत आहेत.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये पुन्हा एकदा चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या कोंढव्यामध्ये ५ वर्षाच्या मुलावर ३ अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केले. पॉर्न व्हिडीओ दाखवत मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. या घटनेमुळे कोंढव्यामध्ये खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये ३ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना घडली आहे. ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलासोबत ३ अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक कृत्य केले. पॉर्न व्हिडिओ दाखवत चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. पुण्यातील कोंढवा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. पिढीत मुलगा सोसायटीत खेळत असताना तिघांनी मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.

धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलाच्या मोठ्या भावासमोर हे अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. या घटनेप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तिन्ही मुलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी पुण्यातील वानवडीमध्ये दोन शाळकरी मुलींवर स्कूलव्हॅनमध्ये चालकानेच लैंगिक अत्याचार केले होते. ही घटना ताजी असतानाच पुण्यामुळे चिमुकल्या मुलावर लैंगिक अत्याचाराची ही घटना समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT