Pune Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime News : जेवणाची चव बिघडली, आचाऱ्यांच्या नाकावर मारला हातोडा; पुढे घडलं असं काही की तुम्हालाही बसेल धक्का

Pune News : जेवणाच्या चव बिघडल्यामुळे तरुणाने नाकावर हातोडा मारून आचाऱ्याचा खून केला आहे. पुण्यातील कोंढवा भागात लेबर कॅम्पमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कमल मार्डी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Sandeep Gawade

जेवणाच्या चव बिघडल्यामुळे तरुणाने थेट हातोडा मारून आचाऱ्याचा खून केला आहे. पुण्यातील कोंढवा भागात लेबर कॅम्पमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शुभम शास्त्री सरकार असं मृत्यू तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी कमल मार्डी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान घडली. कोंढवा भागात एक लेबर कॅम्प तैनात करण्यात आलं आहे. याठिकाणी कमल नारायण मार्डी जेवत होता. जेवत असताना जेवणाची चव त्याला आवडली नाही. त्याने त्याच ठिकाणी असलेल्या आचारी शुभम शास्त्री सरकार याच्याशी त्यावरून वाद घातला. या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं.

यात कमल ने शुभम शास्त्री सरकार यांच्या नाकावर हातोडा मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्याठिकाणी असलेल्या रामप्रीत मंडल ज्याने हा सगळा प्रकार पाहिला त्याच्या डोक्यात देखील हातोडा मारून त्याला देखील कमल ने जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा कोंढवा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT