Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यातल्या लाडक्या बहिणी असुरक्षित? दररोज महिला होतेय वासनेची शिकार, अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी समोर

Pune News : स्वारगेट बस डेपोमधील बलात्कार घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पुण्यातील बलात्कार, विनयभंग अत्याचाराच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Crime : पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत. मागील ४८ तासांपासून हा आरोपी फरार आहे. तो ऊसाच्या शेतात लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याच दरम्यान पुण्यात बलात्कार आणि विनयभंगाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, पुण्यामध्ये दर दिवसाला एकापेक्षा अधिक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. १ जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान तब्बल १२५ घटनांची नोंद झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

पुण्यामध्ये दोन वर्षांमध्ये तब्बस ९१५ बलात्कार झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. तर दीड हजार महिलांचे विनयभंग झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सरासरी पाहता दर दिवसाला एकापेक्षा अधिक अत्याचाराच्या घटना पुण्यात घडल आहेत. स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या बलात्कार घटनेनंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजातील ही विकृती ठेचायचे आव्हान पोलीस आणि प्रशासनासमोर आहे. यावर महायुती सरकार काय अ‍ॅक्शन घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

SCROLL FOR NEXT