Pune Crime Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना; चारित्र्यावर संशय घेत पतीने चाकूने चिरला पत्नीचा गळा

Husband Killed His Wife: पोलिसांनी या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Kondhava News: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीये. (Latets Marathi News)

पती पत्नीच्या (Husband- Wife) नात्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असात. यामध्ये एकमेकांवर असलेला विश्वास या नात्याला अधिक घट्ट करतो. विश्वास नसल्यास त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. अन् त्याचा दुर्दैवी शेवट होतो. पुण्यातील या घटनेत देखील नात्यात विश्वास नसल्यानं मोठा घात झाला आहे.

पुण्यातील (Pune) कोंढवा येथील पिसोळी भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीची हत्या केल्यावर पती तेथून पसार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या महितीनुसार, आरती रणजीत झा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो मोटारीवर चालक म्हणून काम करतो. तर आरती झा एका सराफी पेढेत कर्मचारी म्हणून काम करत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास, ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर

Indian Mobile Number: मोबाईल नंबर हे 10 आकड्यांचेच का असतात?

Fact Check : फ्रिजमध्ये बनलं बर्फाचं शिवलिंग, व्हायरल व्हिडिओ मागच काय आहे सत्य?

Satara Waterfall : पावसाळ्यातील स्वर्ग! साताऱ्यातील 'हे' धबधबे पर्यटकांना घालतात भुरळ

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाचे समन्स

SCROLL FOR NEXT