Pune crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, ६७ वर्षीय आरोपीला अटक

Pune Police: पुण्यातील खडकवासला परिसरात इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. चोरी, दरोडा, कोयता हल्ला, हत्या आणि अत्याचार यासारख्या घटना रोज समोर येत आहेत. अशामध्ये पुण्यामध्ये एका ११ वर्षांच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खडकवासला परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ६७ वर्षांच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकवासला परिसरात इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. एका विकृत नराधमाकडून खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे खडकवासला परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात दिलीप नामदेव मते या ६७ वर्षीय नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून या ११ वर्षांच्या चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने शाळेमधील शिक्षिकेला ही माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना ही माहिती सांगण्यात आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. शिक्षिका, मुख्याध्यापक आणि मुलीच्या पालकांनी हवेली पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी दिलीप नामदेव मतेविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. पुढील तपास हवेली पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT