Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: आधी डांबून ठेवलं मग अंगावर श्वान सोडले; पुण्यात २ महिला अधिकाऱ्यांना घृणास्पद वागणूक, नेमकं काय घडलं?

Pune News: क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी महिलांच्या अंगावर श्वान देखील सोडले.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune Crime:

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वीजबिलाची थकबाकी मागण्यासाठी गेलेल्या दोन महीला अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यात आलं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही महिलांची सुटका करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील डेक्कन परिसरात ही घटना घडलीये. वीजबिलाची थकबाकी असल्याने बोदे यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यांच्याकडे ५ हजार २०६ रुपये वीजबिल थकलेलं आहे. हे वीजबिल लवकरात लवकर पूर्ण करा असं महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र यावेळी बोदे कुटुंबियांडून करुणा आधारी आणि रूपाली कुटे या दोन महिला अधिकाऱ्यांना शिविगाळ करण्यात आली.

पुढे त्यांनी दोन्ही महिलांना शासकीय काम करत असतानाच डांबून ठेवलं. कुटे कुटुंबियांची क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी महिलांच्या अंगावर श्वान देखील सोडले. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही महिला अधिकाऱ्यांची सुटका केली.

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये ललित बोदे आणि आरती बोदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरत एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: टॅनिंग कमी करुन 3 दिवसात मिळवा ग्लोईंग फेस, वापरा 'हा' होममेड स्पेशल फेस मास्क

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

Lockdown News : इराण युद्धामुळे भारतात लॉकडाऊन लागणार? व्हॉट्सॲपवरील 'तो' मेसेज किती खरा? वाचा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

SCROLL FOR NEXT