Pune Crime  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? पुन्हा गोळीबाराची घटना, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

Pune Firing Case: पुण्यामध्ये पुन्हा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारमध्ये एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये पुन्हा गोळीबारची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. खडकवासलानजीकच्या खानापूर गावामध्ये ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. हवेली पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला येथून १० किलोमीटरवर अंतरावर असलेल्या खानापूर गावामध्ये पूर्व वैमनस्यातून शनिवारी मध्यरात्री दोन गटात गोळीबारची घटना घडली. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सध्या परिसरामध्ये भितीचे वातावरण आहे. परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ नये म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे- पानशेत रस्त्यावरील बाजारपेठ असलेल्या खानापूर गावात शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास खानापूर ते सांबरेवाडी रस्त्यावर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. खानापूर गावातीलच हे दोन गट आहेत. पूर्व वैमनस्यातून एका गटाकडून अगोदर गोळीबार करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने देखील गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दोन्ही गटातील व्यक्ती फरार झाले.

मध्यरात्री झालेल्या आवाजामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. यामुळे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ही घटना घडल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आले. या घटनेमध्ये किती वेळा गोळ्या झाडल्या?, यामध्ये कोण कोण होते?, गोळीबाराचे कारण काय?, त्यामध्ये कोण आहे?, या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

Om chanting benefits: दररोज 21 दिवस ‘ॐ’चा जप केल्याने काय बदल घडतात?

भाजलेले चणे सोलून की सालीसकट खावे ? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

SCROLL FOR NEXT