Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रुग्णालयाच्या खिडकीतून फेकले, गुन्हा दाखल

Pune Crime News : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रुग्णालयाच्या खिडकीतून फेकले, बाळाचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> प्रशांत जाधव

Pune Crime News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका आईनेच आपल्या नवजात बालकाला क्रूरपणे रुग्णालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याची घटना घडली आहे. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने या क्रूर आईने हे कृत्य केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून ही 19 वर्षीय तरुणी गर्भवती राहिली होती. त्यानंतर ती पाठीच्या दुखण्याचे आजार सांगून रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला. याविषयी कोणाला काही एक न सांगता हे बाळ तिने रुग्णालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिले. (Latest Marathi News)

हा संपूर्ण प्रकार शनिवारी नऱ्हे येथील काशीबाई नवले रुग्णालयात घडला आहे. याप्रकरणी 19 वर्षे तरुणीवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhgad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी सकाळी ती नवले रुग्णालयातील कॅज्युअलटी वार्ड शेजारी असणाऱ्या एका स्वच्छतागृहात गेली. तिथे तिने एका बाळाला जन्म दिला आणि काहीही विचार न करता तिने हे बाळ खिडकीतून बाहेर फेकून दिले. या संपूर्ण घटनेत या नवजात बाळाचा मृत्यू झाला.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT