Pune crime update saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: बलात्काराच्या घटनांनी पुणे हादरलं! शाळकरी मुलीला धमकावून बलात्कार

या प्रकरणी स्वारगेट पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे - बलात्काराच्या घटनांनी पुणे (Pune) पुन्हा एकदा हादरलं आहे. शहरात गुलटेकडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांमध्ये (Police) गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पीडीत मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १५ वर्षीय शाळकरी मुलगी, तिच्या आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होती. पीडित मुलीचे आई-वडील दोघेही काम करतात.

हे देखील पाहा -

19 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. त्यादिवशी जेव्हा ती घरी कपडे बदलत होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर धमकावून बलात्कार केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर आरोपीने पीडित मुलीचे अपहरण करुन तिला मुंबईमध्ये ठेवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पीडित जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने बळजबरीने तिचे अपहरण करून तिला मुंबईमध्ये नेले. त्यानंतर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहे. तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आली. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, शेतजरी राहणाऱ्या तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

मुलगी शाळेतून घरी आली होती. त्या वेळी घरात कोणी नसल्याचे पाहून महेश मोरेने मुलीवर अत्याचार केले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आणि आरोपी महेश मोरेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : धुकं, डोंगर अन् ३५० फूट उंच धबधबा! लोणावळ्याच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण दिसते स्वर्गाहून सुंदर

Maharashtra News Live Update : गणेश उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम कडकपणे राबवा पर्यावरण संस्थांची पुणे पोलीस आयुक्तांकडे मागणी

Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT