pune crime news  saam tv
मुंबई/पुणे

पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवलं; मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीची अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune Crime News : पुण्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीची अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल केला आहे. या प्रकरणात दोघेही अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वारजे पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अल्पवयीन मुलांची ओळख सोशल मीडियावर झाली. दोघेही एकमेकांना भेटले देखील होते. भेटीनंतर त्यांची मैत्री वाढत गेली. त्यानंतर मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो असे आमिष दाखवलं. ती देखील मित्राच्या आमिषाला बळी पडली. मित्राने तिला आमिष दाखवत अश्लील दाखवत व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडलं.

मित्राने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन तिने काही व्हिडिओ त्याला पाठविले. हेच व्हिडिओ तिच्या मित्राने एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले. त्या मुलीला तिच्या मैत्रिणीन तिचे व्हिडिओ अशा वेबसाईटवर अपलोड झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिने हा सर्व प्रकार घरातल्या सदस्यांना सांगितला. मात्र, भीतीपोटी त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. पण पोलिसांनी या प्रकरणात पुढाकार घेतला. त्यानंतर स्वत: या प्रकरणात तक्रार देत तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिश्नोई गँगच्या नावाखाली राजकीय हत्या होणार? दसरा मेळाव्यानंतर राऊतांचा खळबळजनक दावा

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

SCROLL FOR NEXT