Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: अनैतिक संबंधातून दिरानेच वहिनीसह दोन पुतण्यांना जिवंत जाळलं, पुण्यातील मन सुन्न करणारी घटना

Pune News: पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : पुण्यातून मन सून्न करणारी घटना समोर आली आहे. अनैतिक सबंधातून महिलेसह तिच्या दोन लहानग्यांना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

पुण्यातील या तिहेरी हत्याकांडात दिरानेच वहिनीसह तिच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून जाळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. आरोपीने चारित्र्यावर संशय घेत अगोदर गळा दाबून जीव घेतला आणि नंतर पेटवून दिले असल्याची पोलिसांची माहिती आहे. (Latest Marathi News)

वैभव वाघमारे असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे तर अम्रपाली वाघमारे असे मयत महीलेचे नाव आहे. मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलीला आणि पाच वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT