pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: राज्यात पुन्हा एकदा गोळीबार, पैशाच्या वादातून झाडल्या गोळ्या, नंतर स्वत:लाही संपवलं

Pune Latest News : रिवलीत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना ताजी असताना पुण्यातही गोळीबाराची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Pune Crime latest News:

बोरिवलीत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना ताजी असताना पुण्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ गोळीबाराच्या घटना घडत आहेत. उल्हासनगर,जळगाव, मुंबईनंतर आता पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे.

पुण्यातील औंध भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पैशाच्या वादातून ही गोळीबाराची घटना घडली. आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर आरोपीने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील औंध परिसरात आरोपीने पैशाच्या वादातून एका व्यक्तीवर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर त्या आरोपी व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडत जीवन संपवलं. या आरोपीने रिक्षातच स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

अनिल ढमाले असं मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने ज्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या, त्या व्यक्तीच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT