Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात कोयता गँगचा हैदोस, अंगावर चिखल उडालं म्हणून कोयत्याने केली वाहनांची तोडफोड....

पुण्यात कोयता गँगचा हैदोस, अंगावर चिखल उडालं म्हणून कोयत्याने केली वाहनांची तोडफोड....

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय बडवे

Pune Crime News: पुण्यात सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. येथे कोयता गँगने पुन्हा हैदोस घातला आहे. अंगावर चिखल उडालं म्हणून टोळक्याने थेट कोयत्यांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना येथे घडली आहे. याप्रकरणी इजाज मुनीर शेख यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डोणजे येथील त्याच्या घराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला थांबलेला असतान सिंहगडाकडून येणाऱ्या दुचाकीमुळे त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यातून इजाज व दुचाकीवरील तरुणांची शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाली.  (Latest Marathi News)

यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी करुन ही भांडणे सोडवली. दुसऱ्या दिवशी तोंडाला रुमाल बांधून, हातात कोयते घेऊन १० ते १२ जण दुचाकींवरुन आले व मोठ्या आवाजात शिवीगाळ करत एका चारचाकी आणि एका मोटारसायकलची तोडफोड केली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इजाज व त्याच्या घरातील सर्व सदस्य घाबरले होते. तसेच परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शिवप्रसाद चोरघे यासह इतर १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याआधीही जून महिन्यात अशी घटना घडली होती. पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या सहा जणावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारासह टोळीतील सहा जणांविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली होती. टोळीने कर्वेनगर आणि तळजाई परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी धडक कारवाई करत या टोळीतील चार जणांना अटक होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT