Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात गायिकेकडून तिरंग्याचा अवमान; पोलिसांत तक्रार दाखल, घटनेचा VIDEO VIRAL

Crime News: पुण्यातील एका म्युझिकल कॉन्सर्ट दरम्यान राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News: स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. अशात पुण्यातील एका म्युझिकल कॉन्सर्ट दरम्यान राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात म्युझिकल कॉन्सर्ट दरम्यान राष्ट्रध्वज प्रेक्षकांमध्ये भिरकावण्यात आला आहे. (Latest Pune News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यात एका कॉन्सर्टमध्ये एक गायिका मंचावर गाणं सादर करत होती. त्यावेळी गायिकेने देशाचा तिरंगा (Flag of India) भिरकवत प्रेक्षकांमध्ये टाकला आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात "फ्रिक सुपर क्लब" मध्ये ही घटना घडली आहे. ॲड आशुतोष भोसले यांनी याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, "शांती पीपल" नावाच्या म्युझिकल बँड कडून 'प्री इंडिपेंडेंस डे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी उमा नावाची कलाकार हिने गाणं सादर करत असताना हातात भारताचा तिरंगा (झेंडा) घेतला होता. सादरीकरणाच्या वेळेस तिने देशाचा झेंडा हातात फिरवून समोर असलेल्या ऑडियन्समध्ये फेकून दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मुंढवा पोलिसांकडून याबद्दलची चौकशी सुरु असून, योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT