Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: जीवे मारण्याची धमकी, व्यावसायिकाकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी; पॅरोलवरील सराईताची पुन्हा जेलमध्ये रवानगी

Pune News: तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली..

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरात एका व्यावसायिकाला ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने पानशेत परिसरातून अटक करण्यात आली. आरोपी येरवडा कारागृहातून संचित रजेवर (पॅरोल) बाहेर आला होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोहित शंकर पासलकर (वय २३, रा. रुळे मोरदरी, ता. वेल्हे, जि. पुणे) या तरुणाला खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. तो काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. जेलमधून बाहेर येताच पासलकरने पूर्वी काम करत असलेल्या एका व्यावसायिकाकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली.

याबाबत व्यावसायिकाने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी रोहित पासलकर फरार झाला होता. पोलिसांनी याबाबत अधिक तपास करत सापळा रचून आरोपीला अटक केली.

नागपूर (Nagpur) शहरातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरमधील एका कोळसा व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत सात लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 वर्षांत पगार दुप्पट? वाचा 8व्या वेतन आयोगाचे कॅलक्युलेशन

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीस यांच्या काकांना विश्वास

Maharashtra News Live Update: कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक तपासणी

Maharashtra Freedom of Religion Act 2026: राज्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; उल्लंघन केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT