Pune Husband Killed Wife In Chandannagar Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: संशयाचं भूत मानगुटीवर! जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीला त्याने एका क्षणात संपवलं, पुण्यातील घटना

Pune Husband Killed Wife: चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करीत हत्या केली. पुण्यातील चंदननगर परिसरात ही घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

Pune Husband Killed Wife: पती आणि पत्नीचे भांडण होणं ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना नेहमीच पती-पत्नीमध्ये वाद होतात. अनेकदा हे वाद लगेचच मिटतात, तर काहीवेळा ते विकोपालाही जातात. यातून पुढे गुन्हेगारीच्या घटना घडतात. अशीच एक घटना पुणे शहरातून समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करीत हत्या केली. (Latest Marathi News)

हत्येनंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी केशव सीताफळे याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. लक्ष्मी सीताफळे( पाटीलबुवानगर, खराडी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव भीमराव सीताफळे (वय 45) हा चंदनगर परिसरातील रहिवाशी असून त्याचा पत्नी लक्ष्मी हिच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

वाद इतका विकोपाला गेला, की आरोपी केशव याने पत्नी लक्ष्मीला अमानुष मारहाण केली. मारहाणीनंतर त्याने चाकूने गळा कापून तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपी केशव हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. मी पत्नीची हत्या केली, अशी कबूली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT