pune crime news, crime news,  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पतीच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले... पत्नीसोबत केले भयंकर कृत्य; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

Yerawada Crime News: पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Yerawada Crime: चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील येरवडा भागात ही घटना उघडकीस आली. रूपाली भोसले असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आशिष भोसले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली भोसले आणि आशिष भोसले यांचे लग्न १.५ वर्षांपूर्वी झाले होते. आशिष हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो तर रूपाली धुणे-भांडी करून घर चालवत होती. त्यांना एक ७ महिन्याची मुलगीदेखील आहे.

मात्र मागील काही दिवसांपासून रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आशिषला आला होता. त्यातून त्याने अनेक वेळा तिच्याशी भांडणे केले. शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडणे करून रुपालीला शिवीगाळ केली.

या दरम्यान आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याच्या आधीच तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तात्काळ आरोपीला अटक केली आहे. या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Local Body Election : निवडणुकीआधी शरद पवारांना जोरदार धक्का, २ विश्वासू शिलेदारांचा राष्ट्रवादीला रामराम

Ajit Pawar setback : अजित पवारांना जोरदार धक्का, ४३ पदाधिकार्‍यांचा एकच वेळी 'जय महाराष्ट्र', निवडणुकीआधी राष्ट्रवादीला खिंडार

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजूरी तर मिळाली, पण कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख वाचा

Election News : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका? पुढील आठवड्यात बिगुल वाजणार ? | VIDEO

SCROLL FOR NEXT