Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यातील व्यावसायिकाला 99 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

Crime News : या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

Shivani Tichkule

सचिन जाधव

Pune Crime News : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यात व्यावसायिकाला ९९ लाख ७ हजार रुपयेचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळवण्याच्या नादात प्रलोभनाला बळी पडून व्यवसायिकांनी घराची विक्री करून आरोपीमार्फत शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. (Latest Marathi News)

या प्रकरणात पोलिसांनी (Police) नितीन जगन्नाथ गोते याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी भागातील ५१ वर्षीय व्यवसायिकांने चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती.

तक्रारदार व्यवसायिक आणि आरोपी नितीन गोते यांची वर्षापूर्वी ओळख झाली. गोतेने व्यवसायिकाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा चांगला परतावा मिळाले असे आमिष दाखवले होते. (Pune News)

प्रलोभनाला बळी पडून व्यवसायिकांनी राहत्या घराची विक्री करून त्याला ९९ लाख ७ हजार रुपये दिले होते. व्यवसायिकांनी शेअर बाजारातील व्यवहारा संदर्भात उघडलेल्या बँक खात्याची पडताळणी केली तेव्हा ९९ लाख ७ हजार रुपयांचा तोटा झाल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT