Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: भांडण सोडवायला गेलेल्‍या तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

भांडण सोडवायला गेलेल्‍या तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : आमच्या भांडणात तु मधे का आला? असे म्हणत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील तरुणावर दहा ते पंधरा (Pune News) सराईत गुन्हेगारांच्या टोळीने मेडीकल दुकानात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात (Crime News) तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Tajya Batmya)

सिंहगड रस्त्याला लागून किरकटवाडी फाट्यालगत काही सराईत गुन्हेगार दुसऱ्या एका तरुणाला मारहाण करत होते. त्यावेळी किरकटवाडी येथील स्थानिक तरुणाने मधे जाऊन तरुणाची सुटका केली. त्यावेळी ते गुन्हेगार तेथून निघून गेले व काही वेळानंतर पुन्हा दहा ते पंधरा गुन्हेगारांना घेऊन आले. किरकटवाडी (Police) येथील तरुण मेडिकल दुकानाच्या काऊंटरजवळ थांबलेला होता. त्यावेळी गुन्हेगारांनी त्याला लाथाबुक्क्यांनी व मोठमोठे दगड डोक्यात घालून बेदम मारहाण केली.

पोलिसांकडून अटक

ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी पाच ते सहा गुन्हेगारांना अटक केली आहे. याबाबत हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT