Pune Crime news Saam TV News
मुंबई/पुणे

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Drunk and Drive Case: पुण्यात मद्यधुंद चालकाने वाहतूक डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिली. अपघातात गाडीचे मोठे नुकसान, तसेच डीसीपींच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. मुंढवा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून, गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

  • पुण्यात मद्यधुंद चालकाने वाहतूक डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिली.

  • अपघातात गाडीचे मोठे नुकसान, तसेच डीसीपींच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली.

  • मुंढवा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून, गुन्हा दाखल केला आहे.

  • ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई, पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मद्यधुंद चालकानं थेट वाहतूक विभागाचे डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिली आहे. हा अपघात केशवनगर परिसरात शनिवारी रात्री सुमारे दहा ते साडेदहा वाजेदरम्यान झाला.

या अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच डीसीपी हिम्मत जाधव यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी आरोपी मद्यधुंद चालकाविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपास करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे आरोपींवर ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

९ दिवसांच्या बाळाला सोडून महिला बेपत्ता

पुण्यातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा खंबाट (वय 24) ही महिला आपल्या ९ दिवसांच्या बाळाला सोडून घरातून बेपत्ता झाली आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच तिची डिलिव्हरी झाली असून, सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिचे टाके अद्याप काढलेले नाहीत. वाघोली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT